Posts

Showing posts from March, 2026

प्रिय गायत्रीस्...❤️

Image
प्रिय गायत्रीस्, लेक लाडकी माहेरची,  झालीस सुन तु सासरची मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत.  दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे. गायत्री,  लग्न हे जीवनातील असा एक प्रसंग आहे. ज्यामुळे मुलींचा दुसरा जन्म समजल्या जातो. आईच्या गर्भातून घेतलेला पहिला जन्म आणि आईच्या घरातून नवऱ्याच्या घरात घेतलेला प्रवेश हा दुसरा जन्म.  विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं आहे. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होतो. हे पाऊल घरात टाकताना दोघांनी ही  तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होतो ... हे लक्षात ठेवा.  आणखी एक सुख हे वर्तुळसारख असतं, दुसऱ्याला दिलं, की फिरून ते आपल्यापाशी येतं असत. तु समजूतदार ...