प्रिय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो...❤️
प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन.. ! आज तुमच्या हातात आलेली ही मार्कशीट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर ती तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची, मेहनतीची, संयमाची आणि स्वप्नांची साक्ष आहे. कधी पहाटे उठून केलेला अभ्यास, कधी रात्री उशिरापर्यंत डोळ्यांवर झोप असताना वाचलेले धडे, कधी आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमच्यासाठी केलेले कष्ट, तर कधी शिक्षकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास. या सगळ्याचं हे सुंदर फळ आहे. पहिली इयत्तेपासून सुरू झालेला हा प्रवास खरंच सोपा नव्हता. कधी अभ्यासाचा ताण आला, कधी अपयशाची भीती वाटली, कधी लोकांनी तुलना केली, तर कधी स्वतःलाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडावं लागलं. कधी मित्र पुढे गेले म्हणून वाईट वाटलं असेल, कधी “मी करू शकेन का?” हा प्रश्न स्वतःलाच पडला असेल, पण या सगळ्या परिस्थितींवर मात करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात. म्हणून सर्वात आधी एक गोष्ट शिका. स्वतःचं कौतुक करायला शिका. आपण आयुष्यात खूप वेळा स्वतःच्या चुका मोजत बसतो, पण स्वतःची मेहनत आणि प्रयत्न यां...