महाभारत

महाभारत

विश्वात कथा, पटकथा अनेक आहेत, पण ही महागाथा त्यात विश्र्वतील सर्व कथा आहेत, ती एकच म्हणजे "महाभारत".

महाभारत ही गाथा आहे, सत्यवतीच्या महत्तवाकांक्षेची. ही गाथा आहे, भीष्मच्या प्रतिगेची. ही गाथा आहे शकुनीच्या प्रतिशोधाची. ही गाथा आहे, गांधारीच्या त्यागाची.  ही गाथा आहे, अंध शासनाची. ही गाथा आहे.  दुर्योधनाच्या अहंकाराची.  ही गाथा आहे.  दान वीर योद्धा कर्णची.  ही गाथा आहे.  महानायक अर्जुनाची. ही गाथा आहे, द्रोपत्तीच्या अपमानाची, ही गाथा आहे, अधर्म विरुद्ध धर्मची.  ही गाथा आहे, गुरूच्या शिकवणीची.  ही गाथा आहे, विश्वाच्या कल्याणाची.  ही गाथा आहे, सत्य असत्यची, ही गाथा आहे महाभारताची.


महाभारत ही गाथा आहे इ.स. पूर्व पाच हजार वर्षांपूर्वीची. हा तो काळ होता, ज्यात वारंवार धर्माचा अपमान होत होता. परमात्मा, भगवान यांचा धाक कमी कमी होत होता. भाऊ भावाला मारण्यासाठी कट रचत होता. येवढच नाही तर एका सौभाग्यवत्ती महिलेला भर सभेत अपमानीत केल्या जात होत. ही त्यादिवशीची गोष्ट आहे. ज्यादिवशी धर्माविरुद्ध अधर्म उभा राहिला. द्रोपत्ती या महिलेचं धृतराष्ट्राच्या दरबारात वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला.

       
तिथे उपस्थित असलेले. सरसेनापती भीष्म,पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, धृतराष्ट्राचे 100 पुत्र,सूर्यपुत्र कर्ण,धूतराष्ट्र चा मुलगा दुर्योधन,शकूनी मामा काही न म्हणता फक्त बघत राहिले. दुर्योधनाला हे करण्यापासून ते थांबवू शकले नाही.परंतु तिथे उपस्थित असलेले पाच पांडव देखील खाली मान घालून आपल्या पत्नीचा अपमान सहन करत राहिले. पण ती स्त्री तिचा अपमान होत होता.ती स्त्री मात्र भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना करत होती आणि त्यावेळी उभा जगाचा परमार्थ भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आले आणि तिला वस्त्र पुरवले.त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना कळून चुकले होते की हा अधर्म आहे म्हणून हे जर असच चालू राहिल तर एक दिवस "धर्म काय असतो?" हे सांगत बसावे लागेल. याला कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारताचं आयोजन केलं. त्यावेळेस पाच पांडव हे धर्माच्या बाजूने उभे राहिले सूर्यपुत्र कर्ण हा दुर्योधनाच्या म्हणजेच आपल्या मैत्री प्रेमाखातर अधर्माकडून उभा राहीला. सरसेनापती भीष्म यांनी राजाला वचन दिले होते की 'कोणताही प्रसंग आला तरी मी नेहमी राजाच्या बाजूनेच असेल.' या वचनाखातर भीष्म हे दुर्योधना कडून म्हणजेच अधर्म कडून उभे राहिले. नंतर हा प्रश्न निर्माण झाला की 'भगवान श्रीकृष्ण नेमके धर्माच्या बाजूने आहे की अधर्माच्या बाजूने आहे.'
हा प्रश्न सोडवण्यासाठी धर्माच्या बाजूने अर्जुन आणि अधर्माच्या बाजूने दुर्योधन भगवान श्रीकृष्ण यांना विचारण्यासाठी जातात.त्यावेळी दुर्योधन हा भगवान श्रीकृष्ण यांना न मागता त्यांच्या यादव सैन्याला मागतो. यादव सेना ही अजिंक्य सेना होती.अर्जुन यांनी भगवान श्रीकृष्ण यांना सोबत घेऊन युद्ध करण्यास तयार झाले.परंतु भगवान श्रीकृष्ण यांची अट होती कि 'मी कुठल्याही शस्त्राचा अथवा शक्तीचा उपयोग करणार नाही.' पाच पाडवा मधील भीम यांनी शपथ घेतली की 'मी धूतराष्ट्र पुत्र दुर्योधनाच्या रक्ताने मी द्रोपत्तीला स्नान घालेल.'
या युद्धासाठी काही नियम आटी ठेवल्या गेल्या होत्या त्या अशा होत्या की १) हे युद्ध सूर्योदय नंतर सुरू होईल व सूर्योदयानंतर बंद होईल.२) जे शस्त्र समोरच्या कडे असेल त्याच शस्त्राने त्याच्यासोबत लढता येईल.३) सूर्योदयानंतर कोणताही सैनिक व राजा आक्रमण करणार नाही. ४) कोणीही नकळत वार करणार नाही.
शेवट युद्धाचा दिवस उगवला दुर्योधनाच्या सैन्याचे सरसेनापती भीष्म हे पाच पांडवां वर चालून गेले . त्यावेळेस पाच पांडव मधील युधिष्ठिर हे पांडवांच्या सेनेची प्रमुख होते.पाच पांडव मधील अर्जुन यांचा रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे होते.सरसेनापती भीष्म यांना इच्छामरण होतं.भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारत होत असताना भागवत गीता सांगितली आहे. भगवान श्री कृष्ण त्यांनी भीष्म यांना असं सांगितलं आहे की 'तुम्ही अधर्माच्या बाजूने उभे आहात.द्रोपत्तीवर अन्याय होत असताना तुम्ही काहीही म्हणाला नाहीत.पांडव राजा होता परंतु त्याच्या मुलाला सिंहासनावर बस्ता आलं नाही. तेव्हाही तुम्ही काहीही म्हणाला नाही.आणि आज तुम्ही तुमचे भाचे पाच पांडव यांच्या विरुद्ध उभे आहात.' असे खूप काही भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यानंतर भीष्म हे जखमी झाले व इच्छामरण असल्याकारणाने ते सहा महिने स्वतःच्या सरणावर पडून होते. त्यानंतर दुर्योधन यांच्या सेनेचे सरसेनापती भीष्म हे जखमी झाल्याकारणाने त्यांच्या सेनेचे सरसेनापती पद हे सूर्यपुत्र कर्ण यांनी स्वीकारले. कुरुक्षेत्र मध्ये आल्यानंतर युद्ध करत असताना कर्णयांनी चक्रव्यूह रचले. पांडव सेनेला ठार करत होते. अर्जुन पुत्र अभिमन्यू या बालकाने ते चक्र तोडले. चक्रव्यूह गेल्यानंतर तो जखमी झालेला होता.जखमी झाल्या कारणाने त्याच्या हातात शस्त्र नव्हते. कर्ण याने त्याच्यावर वार केला आणि त्याला तिथेच ठार केले .हे नियमांच्या विरुद्ध होतं नंतर कर्ण च्या रथाचे चाक चिखलात फसले.या कारणाने कर्ण खाली उतरले .अशस्त्र असलेले कर्ण यांच्यावर अर्जुन याने वार केला आणि कर्ण ला सांगितले की 'तू अभिमन्यू अशस्त्र असतानी वार केला' म्हणून मी तुझ्यावर अशस्त्र असताना वार केला.त्यानंतर द्रोणाचार्य हे सरसेनापती झाले . त्यांचे एक वैशिष्ट्य होतं त्यांचा प्राण त्यांच्या पुत्र अश्वत्थामा याच्यात होता. व युधिष्टिर नेहमी सत्य बोल बोलत असे.श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिर यांना असे सांगितले की 'तुम्ही द्रोणाचार्य यांना जाऊन सांगायचे की अश्वधामा मृत्यू पावला' याप्रमाणे हे द्रोणाचार्यांना जाऊन म्हणाले व हे ऐकताच त्यांचा प्राण गेला.त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की' आश्र्वतधामा मेला परंतु मेलेला अश्वतधामा हा तुमचा पुत्र नसून,तो एक हत्ती आहे. तुम्ही गुरु असून देखील अधर्माच्या बाजूने उभे राहिलात हा तुमचा गुणा आहे. भीमाने एकीकडे धुतराष्ट्राचे 99 पुत्र ठार केले होते. आता बारी होती ती दुर्योधनाची. दुर्योधन देखील ठार झाला व शपथ घेतल्याप्रमाणे भीम याने द्रोपती ला रक्त स्नान घातले.
भगवान श्रीकृष्ण हे धर्माच्या बाजूने होते,सत्याच्या बाजूने होते. सत्य नेहमीच जिंकत असत आणि असत्य नेहमी असत्य असत. धृतराष्ट्र पुत्र, सूर्यपुत्र कर्ण, गुरु द्रोणाचार्य, सरसेनापती भीष्म, अश्वधामा हे कितीही महापराक्रमी असले तरी हे धर्मापेक्षा मोठे नाहीत. शंभरातले एकही वाचला नाही, आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही. महाभारतात झालेल्या अधर्मात जिथे जेवढे जेवढे अप्राधित होते ते सर्व मातीमोल झाले. कलियुगात जर का कोणी अधर्म करण्याचा प्रयत्न केला त्यांचेसुद्धा हेच होईल. महाभारत हे जगातील सर्व प्रश्नांचे उत्तर आहे.

कलियुगात प्रत्येकाला स्वतःवर गर्व राहील, तो गर्व मर्यादित ठेवण्यासाठी महाभारत आहे. लोक धर्माच्या चौकटीत राहतील, यासाठी महाभारत आहे. जेव्हा एखाद्याचा अहंकार वाढेल, तो अहंकार न वाढवण्यासाठी महाभारत आहे. जेव्हा कोणाचा अपमान होईल किंवा अपमान करण्याचा प्रयत्न होईल, तो होऊ नये म्हणून महाभारत आहे. "जे झालाय, जे होणार आहे, ते चांगल्यासाठीच आहे." हे सांगण्यासाठी महाभारत आहे.

जिथे अहंकार निर्माण होईल, तिथे महाभारत होईल. जिथे "मीच सर्वश्रेष्ठ आहे" हे वाक्य येईल, तिथे महाभारत होईल. जिथे धर्माचा नाश होईल, तिथे महाभारत होईल. जिथे आपमान होईल, तिथं महाभारत होईल जिथे सत्य हरेल, तिथं महाभारत होईल. आणि युगेयुगे महाभारत होतच राहणार..!


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भव- ति भारत ।

अभ्युत्थान- मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्-|

परित्राणाय- साधूनां विनाशाय च दुष्कृताम्- ।

धर्मसंस्था- पनार्थाय सम्भवामि युगे युगे |

Comments

Popular posts from this blog

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

प्रिय गायत्रीस्...❤️