Game..

 

#खेळ


ते खेळ करतील तुझा
तू खेळ होऊन नको देऊ
ते एकाचे दोन सांगतील
तू एकाचे दोन होऊन नको देऊ

उद्या रचतील तुझ्याविरुद्ध
डाव तु तो डाव यशस्वी होऊन नको देऊ
ते लाख माणंसात  खोटचं बोलतील
पण तू त्या लाख माणंसात खरचं बोल

ते करतील तुझ्याविरुद्ध महाभारत
पण तू मात्र कसलीही पर्वा न करता
कुरुक्षेत्रात उतर अभिमन्यु सारखा
पण परिस्थितीने कवच कुंडल काढला
म्हणून मैदान सोडू नकोस
कर्णा सारखा छाती काढून उभा रहा

खेळ करणारे जवळचेच असतील तुझ्या
त्यांनी तुझा खेळ केला म्हणून
तू त्यांचा खेळ करत बसू नकोस पुढे निघून जा...

सांग त्यांना समजावून #तमाशा आपल्या दोघांचा होणार
पण #जत्रा मात्र पूर्ण गावाची होणार.


#Kishor 

Comments

Popular posts from this blog

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

प्रिय गायत्रीस्...❤️