गप्पा

गप्पा


गप्पा मारल्याने होतो संवाद
गप्पा मारल्याने वाढतो अनुभव

गप्पांनीच  शिकवल

रडता रडता हसायला

गप्पांनीच  शिकवलं

पडता पडता सावरायला


गप्पांमुळेच होतो
एखाद्याचा घात आणि
गप्पांमुळेच मिळते
एखाद्याची आयुष्यभराची साथ

गप्पांमुळेच जुळतात

मना-मनाच्या तारा आणि

गप्पांमुळेच चढतो

एखाद्याचा पारा


गप्पांमुळेच जपून राहतात
त्या गोड आठवणी आणि
गप्पांमुळेच तरळते
कधीतरी डोळ्यात पाणी

टाईमपास म्हणून नाही तर

संभाषण होवो, म्हणून माराव्यात गप्पा

ओझ हलक होईल, म्हणून नाही तर

मन मोकळं होईल, म्हणून माराव्यात गप्पा

म्हणूनच, जो जीभ जिंकेल
तोच मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तोच
जग जिंकेल.......

किशोर बोबडे

Comments

Popular posts from this blog

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

प्रिय गायत्रीस्...❤️