गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤️

Hello BSc Computer Science Batch 2021-2024

कसे आहेत सगळे मजेत ना...

पहिल्यांदा पारनेरला येतं असतांनी डोक्यात खूप गोंधळ होता. पारनेर तालुक्यातील मुल, मुली, शिक्षक आपल्याला समजून घेतील का? अनोळखी शहरात आपल्याला हक्काची लोकं भेटतील का? त्याच वेळी शेजारून एक गाडी गेली.


"जसं होईल तसं" म्हणत तीन वर्ष Complete झाली. काल पूर्ण शिक्षण करून परत घरी येतांनी डोळयात पाणी आलं ते पाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आलं, तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी आलं, तुम्ही मला तुमच्या मनात, घरात जागा दिली आपलंस केलं त्यासाठी. खरचं तुम्ही सर्वांनी मनावरती राज्य केलं. आपण सगळे वेगळे होऊन आज सहा-सात दिवस पूर्ण झाले.

आपला तीन वर्षाचा प्रवास अवघ्या काही दिवसांवर राहिला होता. शेवटचा पेपर झाला. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेला. शेवटच्या दिवसात प्रत्येकाने आपल्या Instagram मध्ये काही Reels Save करून ठेवल्या होत्या. शेवटच्या दिवशी आपल्याला पण आशी Reels काढायची म्हणून, पण आपल्याला तशी Reels काढता आली नाही. आपल्याकडे cinematic Reels नाहीत, पण आठवणी मात्र एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीत. आपण त्यापेक्षाही भारी, आनंदी  College Life Enjoy केली. हेच आपल्या सर्वांसाठी खूप आहे. Group Photo नाही आपल्याकडे, पण आज एक WhatsApp Group हे महत्त्वाचं. आलो, तेव्हा सगळे परके होते. जातानी सगळे आपले होऊन गेले. ज्याला भाऊ नाही, त्याला भाऊ मिळाला. ज्याला बहीण नाही, त्याला बहीण मिळाली तर कोणाला हक्काचा मिञ, तर कोणाला हक्काची मैत्रीण मिळाली. या तीन वर्षात मित्र-मैत्रिणीच, भाऊ-बहीणच नातं तयार झालं आयुष्यभरासाठी.

हसत, खेळत आपण आपली College Life Enjoy केली. हे ही दिवस कसे निघून जातील समजणारच नाही. शेवटच्या क्षणी प्रत्येकाचं मन उदास झालं. डोळयांमध्ये पाणी पण आलं. आज मात्र आठवणीने सगळ्यांच मन भरून येईल. आज डोळयांत खूप आठवणी आहेत. मित्र-मैत्रिणी सोबत केलेला दंगा, मस्ती And Enjoyable Day's सारखं आठवणार... काही जणांनी कॉलेजला न येता Enjoy केला, काही जण कॉलेजला आले, पण वर्गात  बसले नाही त्यांनी Enjoy केला. काही जणांनी तर Lecture सुरू असताना झोपा काढल्या, मोबाईल पाहिला, आणि काही असे ही होते ज्यांना शिक्षकांच शिकवणं कळाल नाही, तरी सुध्दा माना हलवत होते. पण खरं सांगायचं, तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने College Life जगली. हसा खेळा पण शिस्त पाळा या प्रमाणे आपण फक्त हसलो आणि खेळलो थोडी शिस्त पण पाळली म्हणा...!

College फक्त Degree देत नाही, ते आयुष्यभरासाठी माणसं देतं. या कॉलेजने आपल्याला खूप काही दिले. इथून जाताना खूप आठवणी घेऊन प्रत्येक जन घरी निघून गेला. परिस्थितीनुसार किंवा गैरसमज झाल्यामुळे आपल्यात भांडण देखील झाले असतील. ठीक आहे ना, मित्र-मैत्रिणींवर रागावणं, भांडण सगळीकडे होतात, कुठं होत नाही. आपल्यात पण झाले चालायचं आयुष्य आहे. चड उतार येतातच. म्हणून, मैत्रीचं नातं तोडायच असतं काय? आज प्रत्येकाची माफी मागू प्रत्येकाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊ. सगळेच दिवस खूप आठवणीत राहणार आहेत. नंतर काही दिवसांनी काही वर्षांनी आपण पण असच म्हणू..!

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤️


असो, पण आता आपले मार्ग वेगळे झाले. पण स्वप्न मात्र एकचं आई वडिलांचे नाव मोठे करण्याचे आणि आपण सगळे ते पुर्ण करणार. खरं, तर हे आपल्याला शिक्षकाने किंवा एखाद्या मार्गदर्शक करणाऱ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं. असो, पण जिथे पर्याय म्हणून कोणी नाही, तिथे आपण स्वतः उभा राहू. एकमेकांना आधार देऊ. जिथे मी चुकेल,, तिथं तुम्ही मला सांगा. जिथं तुम्ही चुकाल, तिथं मी सांगेल ही भावना मनामध्ये घेऊन. उद्या आपण वेगवेगळ्या दिशांना जाऊ, पण संघर्ष मात्र प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. त्या वेळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला हरायचं नाही. खांद्याला खांदा लावून आपली स्वतःची प्रतिमा तयार करू. येणाऱ्या काळात आपली भेट होईल, नाही होईल सांगता येत नाही. पण आपली ओळख ही "हा माझा वर्गमित्र" किंवा "ही माझी वर्गमैत्रीण" म्हणून नको तर आपली ओळख ही आपल्या कार्यकर्तृत्वावर झाली पाहिजे. प्रत्येकात काही ना काही गुण आहे. (एक से बढ़कर एक). काही जण शिक्षण घेतील, काही MPSC, UPSC तयारी करतील, काही जण Job करतील, काही Business करतील, काहीजण राजकीयमार्ग निवडतील, तर काही जण नाविन्यपुर्ण असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. नक्की करा, कारण हल्लीच युग स्पर्धेच आहे. ज्या क्षेत्रात उतराल त्या क्षेत्रातील बाप बना.

ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी ज्याला वाचण्याची आवड असेल त्यांनी वाचन करा, ज्याला लिहिण्याची आवड असेल त्यांनी लिखाण करा, ज्याला बोलण्याची आवड असेल त्यांनी बोला. आपल्या आवडी-निवडी जोपासा. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका दोघांना ही तुमच्या प्रतिक्रिये शिवाय महत्त्व नाही. स्व:ताला जे काम येतं ते काम अजून परफेक्ट कसं होईल याकडे लक्ष द्या.
 
ज्यांनी टोमणे मारले, ज्यांनी आपली थट्टा उडवली, जे आपल्यावर हसले, त्यांच्यासाठी नाही, तर ज्या आईने आपल्या वरती साडीच्या पदराची सावली धरली त्या आईसाठी, ज्या बापाने आयुष्यभर उन्हाच्या  जळाया आपल्या साठी खाल्या त्या बापासाठी. आपण त्यांचे शिवराय म्हणून स्वराज्य निर्माण करू. आणि  आकाशाला गवसणी घालू.

कुणीतरी येऊन आपल्या आयुष्यात रंग भरेल, ही कल्पनाच मुळात झुठ आहे. कारण ज्याचं त्याला स्वतंत्र आभाळ असते. आणि आपल्या आभाळाचे आपणच इंद्रधनुष्य असतो.
तुम्हा सर्वांना तुमच्या Bright Future साठी माझ्याकडून All the Best❤️ लवकरच भेटू... #एक नये अंदाज मैं

हिंदी फिल्मो की तरह
अगर अंत मे सब कुछ अच्छा ना हो
तो वो अंत नही पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त💯
📷....

Comments

Popular posts from this blog

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

प्रिय गायत्रीस्...❤️