Posts

प्रिय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो...❤️

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन.. !  आज तुमच्या हातात आलेली ही मार्कशीट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर ती तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची, मेहनतीची, संयमाची आणि स्वप्नांची साक्ष आहे. कधी पहाटे उठून केलेला अभ्यास, कधी रात्री उशिरापर्यंत डोळ्यांवर झोप असताना वाचलेले धडे, कधी आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमच्यासाठी केलेले कष्ट, तर कधी शिक्षकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास. या सगळ्याचं हे सुंदर फळ आहे. पहिली इयत्तेपासून सुरू झालेला हा प्रवास खरंच सोपा नव्हता. कधी अभ्यासाचा ताण आला, कधी अपयशाची भीती वाटली, कधी लोकांनी तुलना केली, तर कधी स्वतःलाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडावं लागलं. कधी मित्र पुढे गेले म्हणून वाईट वाटलं असेल, कधी “मी करू शकेन का?” हा प्रश्न स्वतःलाच पडला असेल, पण या सगळ्या परिस्थितींवर मात करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात. म्हणून सर्वात आधी एक गोष्ट शिका.  स्वतःचं कौतुक करायला शिका. आपण आयुष्यात खूप वेळा स्वतःच्या चुका मोजत बसतो, पण स्वतःची मेहनत आणि प्रयत्न यां...

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

Image
एका आवाजाचा, एका स्वप्नाचा आणि एका आईच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद पाहण्यासाठी केलेला चौदा वर्षांचा वनवास… काही स्वप्नं स्वतःसाठी नसतात, तर ती आईच्या डोळ्यांतला अभिमान परत आणण्यासाठीची ही असतात. नादाची किंमत आणि जिद्दीचा परिणाम कधीच लगेच दिसत नाही. त्यासाठी स्वतःला तुटू द्यावं लागतं, हरू द्यावं लागतं, आणि पुन्हा उभं राहावं लागतं.  K.G.F मध्ये आई आणि मुलाची गोष्ट जगाविरुद्ध होती, पण इथं वेगळचं आहे. आई आणि मुलाची गोष्ट स्वतःशी चं आहे. मुलाच अस्तित्व  सिद्ध करण्याची आणि आईच्या अभिमानासाठीची.... मी इयत्ता पहिलीत होतो. संपूर्ण देशात १५ ऑगस्टचा उत्साह अर्थातच भारताचा स्वातंत्र्यदिन सगळीकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. माझ्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईसारवाडी मध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात वकृत्व स्पर्धा म्हणजेच भाषणाचा कार्यक्रमही होता. त्यात माझ्या वर्गातील एक मुलगा व्यासपीठावर गेला, त्याने खुप छान भाषण केलं आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. कार्यक्रम संपला. शाळेतून मिळालेली दोन बिस्किटं आणि गोळ्या घेऊन मीही आनंदात घरी निघालो. घरी पोहोचताच आ...

The journey of knowing oneself never ends. It only keeps changing its form.

Image
While walking on paths, one never knows where they will lead us… But in the end, it is understood that those very paths have given us our identity.  The journey of life never really ends; once it begins at birth, it ends only when life meets a full stop…!! Playing with oneself in childhood is liked by everyone, but when we grow up and responsibilities come, playing with oneself and handling them becomes troublesome. Later, when we grow a little older, crawling with curiosity and trying to stand up by holding our parents’ feet is a moment of joy for the well-wishers who appreciate us and for us. But now, while walking on the journey, even if we stumble somewhere, we feel more happiness in convincing our parents that we are doing well. When we become a little older, taking support to stand and taking the first step with feet adorned with anklets, the claps from our parents and the overflowing joy on their faces still fill us with delight even today. But now, on the journey, we...