Posts

The journey of knowing oneself never ends. It only keeps changing its form.

Image
While walking on paths, one never knows where they will lead us… But in the end, it is understood that those very paths have given us our identity.  The journey of life never really ends; once it begins at birth, it ends only when life meets a full stop…!! Playing with oneself in childhood is liked by everyone, but when we grow up and responsibilities come, playing with oneself and handling them becomes troublesome. Later, when we grow a little older, crawling with curiosity and trying to stand up by holding our parents’ feet is a moment of joy for the well-wishers who appreciate us and for us. But now, while walking on the journey, even if we stumble somewhere, we feel more happiness in convincing our parents that we are doing well. When we become a little older, taking support to stand and taking the first step with feet adorned with anklets, the claps from our parents and the overflowing joy on their faces still fill us with delight even today. But now, on the journey, we...

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

Image
वाटा चालताना कधी समजत नाही, त्या आपल्याला कुठे घेऊन जातील,  पण शेवटी कळतं त्या वाटांनीच आपल्याला आपली ओळख दिलेली असती. आयुष्यातला प्रवास संपतच नाही, जन्मापासून सुरू झाला की, जिंदगीला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!! बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं,  कठीण जातं. नंतर थोडे मोठे झालो, तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई बाबांच्या पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी तो आनंदाचा क्षण असतो, पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं, तरी आई-बाबांना खुशालीतच आहे, हे पटवून देण्यात जास्त आनंद वाटतो . आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुन-छुन घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना आई-बाबाने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंबून वाहणारा आनंद आजही हर्षभरीत करून जातो, पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही, तर आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो. जीवनात असे खूप प्रवास करावे लागतात, पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच ...

प्रिय गायत्रीस्...❤️

Image
प्रिय गायत्रीस्, लेक लाडकी माहेरची,  झालीस सुन तु सासरची मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत.  दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे. गायत्री,  लग्न हे जीवनातील असा एक प्रसंग आहे. ज्यामुळे मुलींचा दुसरा जन्म समजल्या जातो. आईच्या गर्भातून घेतलेला पहिला जन्म आणि आईच्या घरातून नवऱ्याच्या घरात घेतलेला प्रवेश हा दुसरा जन्म.  विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं आहे. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होतो. हे पाऊल घरात टाकताना दोघांनी ही  तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होतो ... हे लक्षात ठेवा.  आणखी एक सुख हे वर्तुळसारख असतं, दुसऱ्याला दिलं, की फिरून ते आपल्यापाशी येतं असत. तु समजूतदार ...

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤️

Image
Hello BSc Computer Science Batch 2021-2024 कसे आहेत सगळे मजेत ना... पहिल्यांदा पारनेरला येतं असतांनी डोक्यात खूप गोंधळ होता. पारनेर तालुक्यातील मुल, मुली, शिक्षक आपल्याला समजून घेतील का? अनोळखी शहरात आपल्याला हक्काची लोकं भेटतील का? त्याच वेळी शेजारून एक गाडी गेली. " जसं होईल तसं " म्हणत तीन वर्ष Complete झाली. काल पूर्ण शिक्षण करून परत घरी येतांनी डोळयात पाणी आलं ते पाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आलं, तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी आलं, तुम्ही मला तुमच्या मनात, घरात जागा दिली आपलंस केलं त्यासाठी. खरचं तुम्ही सर्वांनी मनावरती राज्य केलं.  आपण सगळे वेगळे होऊन आज सहा-सात दिवस पूर्ण झाले. आपला तीन वर्षाचा प्रवास अवघ्या काही दिवसांवर राहिला होता. शेवटचा पेपर झाला. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेला. शेवटच्या दिवसात प्रत्येकाने आपल्या Instagram मध्ये काही Reels Save करून ठेवल्या होत्या. शेवटच्या दिवशी आपल्याला पण आशी Reels काढायची म्हणून, पण आपल्याला तशी Reels काढता आली नाही.  आपल्याकडे cinematic Reels नाहीत,  पण आठवणी मात्र एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही...

गप्पा

Image
गप्पा गप्पा मारल्याने होतो संवाद गप्पा मारल्याने वाढतो अनुभव गप्पांनीच  शिकवल रडता रडता हसायला गप्पांनीच   शिकवलं पडता पडता सावरायला गप्पां मुळेच होतो एखाद्याचा घात आणि गप्पां मुळेच  मिळते एखाद्याची आयुष्यभराची साथ गप्पां मुळेच  जुळतात मना-मनाच्या तारा आणि गप्पां मुळेच  चढतो एखाद्याचा पारा गप्पां मुळेच  जपून राहतात त्या गोड आठवणी आणि गप्पां मुळेच  तरळते कधीतरी डोळ्यात पाणी टाईमपास म्हणून नाही तर संभाषण होवो, म्हणून माराव्यात गप्पा ओझ हलक होईल, म्हणून नाही तर मन मोकळं होईल, म्हणून माराव्यात गप्पा म्हणूनच, जो जीभ जिंकेल तोच मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तोच जग जिंकेल....... किशोर बोबडे

Game..

Image
  # खेळ ते खेळ करतील तुझा तू खेळ होऊन नको देऊ ते एकाचे दोन सांगतील तू एकाचे दोन  होऊन नको देऊ उद्या रचतील तुझ्याविरुद्ध डाव तु तो डाव यशस्वी  होऊन नको देऊ ते लाख माणंसात  खोटचं बोलतील पण तू त्या लाख  माणंसात  खरचं बोल ते करतील तुझ्याविरुद्ध महाभारत पण तू मात्र कसलीही पर्वा न करता कुरुक्षेत्रात उतर अभिमन्यु सारखा पण परिस्थितीने कवच कुंडल काढला म्हणून मैदान सोडू नकोस कर्णा सारखा छाती काढून उभा रहा खेळ करणारे जवळचेच असतील तुझ्या त्यांनी तुझा खेळ केला म्हणून तू त्यांचा खेळ करत बसू नकोस पुढे निघून जा... सांग त्यांना समजावून #तमाशा आपल्या दोघांचा होणार पण #जत्रा मात्र पूर्ण गावाची होणार. #Kishor 

"ग्रंथदिंडी" 📍 New Art's Commerce And Science College Parner

Image
कधी कधी वाटतं, माणसं जितकी भेटत नाहीत, त्यापेक्षा जास्त पुस्तकं भेटतात. काही पुस्तकं विचार देतात, काही जखमा भरतात. आणि काही पुस्तकं शांतपणे आपल्याला नव्याने घडवत राहतात. पुस्तकं सांगतात कथा पुस्तकं  मांडतात व्यथा पुस्तकं  जाणतात गाथा भल्याबु-ऱ्या माणसांची  पुस्तकं  चितारतात युद्ध पुस्तकं  समजावतात बुद्ध पुस्तकंच  करतात समृद्ध भल्याबु-ऱ्या माणसास  वाचता वाचता शब्दांचा हा असा पाडतात पाऊस हसवतात रडवतात  त्यातून घडवतात माणूस .... वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्।वार्धके दुःखहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।। लहानपणी 'वाचन' ज्ञानदायक असते, तर तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करते, आणि म्हातारपणी दुःख दूर करते. म्हणून चांगल्या ग्रंथांचे नेहमी वाचन केले पाहिजे. वाचन ही लेखणीची जननी आहे , कारण काहीतरी  लिहिण्याआधी काहीतरी वाचन गरजेचं असतं. पुस्तक वाचण्याचा छंद आपल्याला एकाच आयुष्यात हजार आयुष्य जगण्याचा अनुभव देतो, आणि सर्वांगाने समृद्ध करतो. समृद्धीकडे जाण्याची ही वाटचाल सुखकर होण्यासाठी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर   जि.अहिल्यानगर...