गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤️
Hello BSc Computer Science Batch 2021-2024 कसे आहेत सगळे मजेत ना... पहिल्यांदा पारनेरला येतं असतांनी डोक्यात खूप गोंधळ होता. पारनेर तालुक्यातील मुल, मुली, शिक्षक आपल्याला समजून घेतील का? अनोळखी शहरात आपल्याला हक्काची लोकं भेटतील का? त्याच वेळी शेजारून एक गाडी गेली. " जसं होईल तसं " म्हणत तीन वर्ष Complete झाली. काल पूर्ण शिक्षण करून परत घरी येतांनी डोळयात पाणी आलं ते पाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आलं, तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी आलं, तुम्ही मला तुमच्या मनात, घरात जागा दिली आपलंस केलं त्यासाठी. खरचं तुम्ही सर्वांनी मनावरती राज्य केलं. आपण सगळे वेगळे होऊन आज सहा-सात दिवस पूर्ण झाले. आपला तीन वर्षाचा प्रवास अवघ्या काही दिवसांवर राहिला होता. शेवटचा पेपर झाला. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेला. शेवटच्या दिवसात प्रत्येकाने आपल्या Instagram मध्ये काही Reels Save करून ठेवल्या होत्या. शेवटच्या दिवशी आपल्याला पण आशी Reels काढायची म्हणून, पण आपल्याला तशी Reels काढता आली नाही. आपल्याकडे cinematic Reels नाहीत, पण आठवणी मात्र एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही...