Posts

प्रिय गायत्रीस्...❤️

Image
प्रिय गायत्रीस्, लेक लाडकी माहेरची,  झालीस सुन तु सासरची मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत.  दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे. गायत्री,  लग्न हे जीवनातील असा एक प्रसंग आहे. ज्यामुळे मुलींचा दुसरा जन्म समजल्या जातो. आईच्या गर्भातून घेतलेला पहिला जन्म आणि आईच्या घरातून नवऱ्याच्या घरात घेतलेला प्रवेश हा दुसरा जन्म.  विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं आहे. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होतो. हे पाऊल घरात टाकताना दोघांनी ही  तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होतो ... हे लक्षात ठेवा.  आणखी एक सुख हे वर्तुळसारख असतं, दुसऱ्याला दिलं, की फिरून ते आपल्यापाशी येतं असत. तु समजूतदार ...

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤️

Image
Hello BSc Computer Science Batch 2021-2024 कसे आहेत सगळे मजेत ना... पहिल्यांदा पारनेरला येतं असतांनी डोक्यात खूप गोंधळ होता. पारनेर तालुक्यातील मुल, मुली, शिक्षक आपल्याला समजून घेतील का? अनोळखी शहरात आपल्याला हक्काची लोकं भेटतील का? त्याच वेळी शेजारून एक गाडी गेली. " जसं होईल तसं " म्हणत तीन वर्ष Complete झाली. काल पूर्ण शिक्षण करून परत घरी येतांनी डोळयात पाणी आलं ते पाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आलं, तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी आलं, तुम्ही मला तुमच्या मनात, घरात जागा दिली आपलंस केलं त्यासाठी. खरचं तुम्ही सर्वांनी मनावरती राज्य केलं.  आपण सगळे वेगळे होऊन आज सहा-सात दिवस पूर्ण झाले. आपला तीन वर्षाचा प्रवास अवघ्या काही दिवसांवर राहिला होता. शेवटचा पेपर झाला. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेला. शेवटच्या दिवसात प्रत्येकाने आपल्या Instagram मध्ये काही Reels Save करून ठेवल्या होत्या. शेवटच्या दिवशी आपल्याला पण आशी Reels काढायची म्हणून, पण आपल्याला तशी Reels काढता आली नाही.  आपल्याकडे cinematic Reels नाहीत,  पण आठवणी मात्र एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही...

गप्पा

Image
गप्पा गप्पा मारल्याने होतो संवाद गप्पा मारल्याने वाढतो अनुभव गप्पांनीच  शिकवल रडता रडता हसायला गप्पांनीच   शिकवलं पडता पडता सावरायला गप्पां मुळेच होतो एखाद्याचा घात आणि गप्पां मुळेच  मिळते एखाद्याची आयुष्यभराची साथ गप्पां मुळेच  जुळतात मना-मनाच्या तारा आणि गप्पां मुळेच  चढतो एखाद्याचा पारा गप्पां मुळेच  जपून राहतात त्या गोड आठवणी आणि गप्पां मुळेच  तरळते कधीतरी डोळ्यात पाणी टाईमपास म्हणून नाही तर संभाषण होवो, म्हणून माराव्यात गप्पा ओझ हलक होईल, म्हणून नाही तर मन मोकळं होईल, म्हणून माराव्यात गप्पा म्हणूनच, जो जीभ जिंकेल तोच मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तोच जग जिंकेल....... किशोर बोबडे

Game..

Image
  # खेळ ते खेळ करतील तुझा तू खेळ होऊन नको देऊ ते एकाचे दोन सांगतील तू एकाचे दोन  होऊन नको देऊ उद्या रचतील तुझ्याविरुद्ध डाव तु तो डाव यशस्वी  होऊन नको देऊ ते लाख माणंसात  खोटचं बोलतील पण तू त्या लाख  माणंसात  खरचं बोल ते करतील तुझ्याविरुद्ध महाभारत पण तू मात्र कसलीही पर्वा न करता कुरुक्षेत्रात उतर अभिमन्यु सारखा पण परिस्थितीने कवच कुंडल काढला म्हणून मैदान सोडू नकोस कर्णा सारखा छाती काढून उभा रहा खेळ करणारे जवळचेच असतील तुझ्या त्यांनी तुझा खेळ केला म्हणून तू त्यांचा खेळ करत बसू नकोस पुढे निघून जा... सांग त्यांना समजावून #तमाशा आपल्या दोघांचा होणार पण #जत्रा मात्र पूर्ण गावाची होणार. #Kishor 

"ग्रंथदिंडी" 📍 New Art's Commerce And Science College Parner

Image
कधी कधी वाटतं, माणसं जितकी भेटत नाहीत, त्यापेक्षा जास्त पुस्तकं भेटतात. काही पुस्तकं विचार देतात, काही जखमा भरतात. आणि काही पुस्तकं शांतपणे आपल्याला नव्याने घडवत राहतात. पुस्तकं सांगतात कथा पुस्तकं  मांडतात व्यथा पुस्तकं  जाणतात गाथा भल्याबु-ऱ्या माणसांची  पुस्तकं  चितारतात युद्ध पुस्तकं  समजावतात बुद्ध पुस्तकंच  करतात समृद्ध भल्याबु-ऱ्या माणसास  वाचता वाचता शब्दांचा हा असा पाडतात पाऊस हसवतात रडवतात  त्यातून घडवतात माणूस .... वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्।वार्धके दुःखहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।। लहानपणी 'वाचन' ज्ञानदायक असते, तर तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करते, आणि म्हातारपणी दुःख दूर करते. म्हणून चांगल्या ग्रंथांचे नेहमी वाचन केले पाहिजे. वाचन ही लेखणीची जननी आहे , कारण काहीतरी  लिहिण्याआधी काहीतरी वाचन गरजेचं असतं. पुस्तक वाचण्याचा छंद आपल्याला एकाच आयुष्यात हजार आयुष्य जगण्याचा अनुभव देतो, आणि सर्वांगाने समृद्ध करतो. समृद्धीकडे जाण्याची ही वाटचाल सुखकर होण्यासाठी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर   जि.अहिल्यानगर...

महाभारत

Image
महाभारत विश्वात कथा, पटकथा अनेक आहेत, पण ही महागाथा त्यात विश्र्वतील सर्व कथा आहेत, ती एकच म्हणजे  "महाभारत" . महाभारत ही गाथा आहे, सत्यवतीच्या महत्तवाकांक्षेची. ही गाथा आहे, भीष्मच्या प्रतिगेची. ही गाथा आहे शकुनीच्या प्रतिशोधाची. ही गाथा आहे, गांधारीच्या त्यागाची.  ही गाथा आहे, अंध शासनाची. ही गाथा आहे.  दुर्योधनाच्या अहंकाराची.  ही गाथा आहे.  दान वीर योद्धा कर्णची.  ही गाथा आहे.  महानायक अर्जुनाची. ही गाथा आहे, द्रोपत्तीच्या अपमानाची, ही गाथा आहे, अधर्म विरुद्ध धर्मची.  ही गाथा आहे, गुरूच्या शिकवणीची.  ही गाथा आहे, विश्वाच्या कल्याणाची.  ही गाथा आहे, सत्य असत्यची, ही गाथा आहे महाभारताची. महाभारत ही गाथा आहे इ.स. पूर्व पाच हजार वर्षांपूर्वीची. हा तो काळ होता, ज्यात वारंवार धर्माचा अपमान होत होता. परमात्मा, भगवान यांचा धाक कमी कमी होत होता.  भाऊ भावाला मारण्यासाठी कट रचत होता. येवढच नाही तर एका सौभाग्यवत्ती महिलेला भर सभेत अपमानीत केल्या जात होत.  ही त्यादिवशीची गोष्ट आहे. ज्यादिवशी धर्माविरुद्ध अधर्म उभा राहिला....

प्रिय ठुबे सर ❤️

Image
प्रिय ठुबे सर, आज माननीय, आदरणीय, सन्माननीय सर असा उल्लेख करणार नाही. आज आवर्जून आणि हक्काने प्रिय सर असाच उल्लेख करणार. माफी असावी लहान तोंडी मोठा घास घेतोय. आज कळतय की श्रीकृष्ण मथुरानगरी सोडून जाताना, तिथे असलेल्या व्यक्तींवरती कोणता प्रसंग आला असेल . सर नक्कीच तुम्ही पारनेर शहरामध्ये शिस्त व शिक्षणाची गंगा घरोघरी नेली. माणुसकीच दुसरं उदाहरण, म्हणजे पारनेर कॉलेजचे प्राचार्य व उपप्राचार्य. कधीही विचार न केलेला प्रसंग समोर येऊन उभा आहे. पारनेर महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य म्हणून ओळखले जाणारे आर. के. आहेर सर व पारनेर कॉलेजचे शिस्तबद्ध असणारे उपप्राचार्य डी. आर. ठुबे सर यांची बदली झाली. एकाच वेळी विद्यार्थ्यांवरती दोन वार झालेत. विद्यार्थी ते पचवू शकत नाही हेही तितकच खरं... आज नक्कीच तुम्ही मथुरा सोडून जात आहे, पण मनामध्ये खूप विश्वास आहे, की तुम्ही जिथे असाल तिथे द्वारकानगरी उभा करणार.  काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत.  त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांचं मोठेपण सांगते.  सर,   भारतातील ग्रामीण भागातलं A++ ग्रेड असणार पहिलं महाविद्यालय ...